विविध उपक्रम

मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना, पुणे  दक्षिण विभाग व सहकार नगर बिबवेवाडी गट यांच्या संयुक्त विद्यमाने व सौ. अश्विनीताई आणि नितीन भैय्या यांच्या उत्स्फर्त सहभागाने आयोजित करण्यात येणाऱ्या साठीतल्या ज्येष्ठ नागरिक वयाच्या तिसऱ्या पंचविशीला स्पर्श करण्यासाठी सज्ज झालेल्या वयोवृध्द मंडळींच्या मानसिक स्वास्थ्य व शारिरीक आरोग्य दृष्ट्या अत्यंत पोषक व आनंददायी अशा या वार्षिक आनंद मेळाव्यांमध्ये खरोखरंच जणू या मंडळींच्या हातावरच्या लाईफ लाईन्स लांबविण्याची ताकद सामावलेली असते. साहजिकच त्यामुळे या दरवर्षीच्या आनंद मेळाव्याला मिळणारा ज्येष्ठ नागरिकांचा हा स्वयंस्फूर्त प्रतिसाद हा अत्यानंद काही वेगळाच असतो.

आपल्या प्रभाग व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद न्याहाळण्याचा हा छंद नितीन कदम व अश्विनीताईंनी वर्षानुवर्षे जोपासला आहे. याच छंदापोटी त्यांनी आपल्या या ज्येष्ठ मंडळींसाठी प्रभागात एक अद्ययावत विरंगुळा केंद्रच उभारले आहे. तसेच प्रत्येक वर्षी एका खास विशिष्ट आनंद मेळ्याचे देखील या ज्येष्ठ नागरिकांसाठी आवर्जुन आयोजन केले जाते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा महा संचलनाच्या स्वागतासाठी अश्विनीताई व नितीन भैय्या आणि सहकारी कार्यकर्त्यांनी सुंदर रांगोळ्यांच्या पायघड्या घालून विलक्षण आनंदात साग्रसंगीत स्वागत सातत्याने करून आपल्या प्रभागातील विजयादशमीचा आनंद द्विगुणित केला.

प्रत्येक वर्षी रामनवमी उत्सवात केल्या जाणाऱ्या सामूहिक रामरक्षा पठण कार्यक्रमाचे भक्तिपूर्ण आयोजन केले जाते. याप्रसंगी प्रभाग आणि परिसरातील शेकडो भाविक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. अशाच यंदाच्या या सामूहिक रामरक्षा पठण कार्यक्रम प्रसंगी, संयोजिका नगरसेविका सौ. अश्विनीताई कदम.

स्थानिक प्रत्येक रिक्षा स्टॅण्ड श्रावणातील कोणत्याही एका शुभवारी रिक्षा चालक मालक सामूहिक रिक्षा पूजनाचे कार्यक्रम आयोोजित करतात, याप्रसंगी भैय्या आणि वहिनी सक्रिय सहभागी होतात.

दिपावलीचा सण. दिपोत्सवाचा क्षण आणि आनंदाने ओथंबलेले मन हा एकत्रित अनुभव प्रभागवासियांना अश्विनीताई व नितीन भैय्या दरवर्षीच अनुभवायला देतात. ज्यासाठी यश, शांती, सुख-समृध्दीच्या शुभेच्छा देत सारेच एका विलक्षण आनंदात एकवटतात. आणि एकेक दिवा प्रज्योलित करतात.

मकर संक्रातीच्या स्नेहपूर्ण गाठीभेटी आणि नागपंचमीच्या झिम्मा फुगड्या-भोंडला उत्सवप्रिय सहकारी महिलांसाठी. अशा प्रकारच्या या सण उत्सवांच्या उत्साहात अश्विनीताई नेहमीच सहभागी नव्हे तर अग्रभागी राहून महिलांवर्गात हरवून जातात.

प्रभागातील आपल्या गवळी बांधवांच्या दरवर्षी पार पडणाऱ्या सगर उत्सवात सक्रिय सहभागी होत अश्विनीताई, नितीन भैय्या आणि सहकारी सर्वच कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी होतात आणि गवळी बांधवांच्या प्रति आपल्या शुभेच्छा मनापासून व्यक्त करतात.

प्रभाग व परिसरातील उत्सवप्रिय गृहलक्ष्मी आणि पाकनिपुण सुगरर्णीसाठी गणेशोत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या माझाच नैवद्य सुग्रास या बाप्पांच्या विनाशुल्क नैवद्य (प्रात्यक्षिक) स्पर्धेतील यशस्वी स्पर्धक महिलांसमवेत या उपक्रमाचे संकल्पक व कार्यक्रमाचे संयोजक नगरसेविका सौ. अश्विनीताई कदम व नितीन कदम.

आपल्या परिसरातील वातावरण भक्तिमय रहावे, तसेच त्यासाठी नेहमीच स्थानिक देऊळे, मंदिरांमधून कार्यरत असणाऱ्या, भजन करणाऱ्या महिला भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या भक्तिगीतांच्या भजन मंडळांच्या या स्पर्धांना नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळत असतो. अर्थातच यासाठी सौ. अश्विनीताई व नितीन भैय्यांचे एक पाऊल पुढेच असते.

अखिल अरण्येश्वर नवरात्र महोत्सवात महिलांचा उत्साह अधिक द्विगुणित करण्यासाठी सौ. अश्विनीताई व नितीन भैय्यांचा हे आणखी एक उत्स्फूर्त पाऊल.या महोत्सवा दरम्यान आयोजित लकी ड्रॉ कार्यक्रम प्रसंगी भाग्यवंत सौभाग्यवतींचा लकी ड्रॉ घोषित करुन बक्षीसे वाटप करताना.

प्रवासी सेवेसाठी नेहमीच उन्हातान्हात कटिबध्द असणाऱ्या रिक्षावाले काकांच्या रिक्षातच ठेवता येतील अशा खास उन्हाळी पिण्याच्या पाण्याच्या पिशव्यांचे वाटप करुन रिक्षावाल्या बांधवाच्या मेहनतीला दाद देताना सौ. अश्विनीताई व नितीन भैय्या, रिक्षा पंचायतच नितीन पवार आणि सहकारी कार्यकर्ते.

ऐन उन्हाळ्यात स्वतःची पर्वा न करता लोकांची खबरबात, ख्यालीखुशाली एकमेकांपर्यंत पोहोचविणारी पत्रे, घराघरांपर्यत वेळेत पोहोचविण्यासाठी कधी सायकल तर कधी पायी धावपळ करणाऱ्या पोस्टमन्सची गरज ओळखून अश्विनीताईनी खास उन्हाळी कॉटन कॅप्सचे (टोप्या) वाटप केले. कार्यक्रम प्रसंगी आपल्या पोस्टमन्स बांधवासमवेत मा. स्थायी समिती अध्यक्षा, न गरसेविका सौ. अश्विनीताई कदम आणि संबधित सहकारी.

आरोग्य शिबीर

आयुष्यमान कार्ड वाटप

रक्तदान शिबीर

संगणक वाटप

दिवाळी पहाट

ई कचरा संकलन अभियान

विनामूल्य पीयूसी वाटप

गणेश विसर्जन हौद

गोमाता पूजन

गॅस सुरक्षितता अभियान

जागतिक महिला दिन

कचरा व्यवस्थापन

कन्यापूजन

कराटे प्रशिक्षण

मराठी भाषा दिन

पीएमपीएमएल कर्मचारी आरोग्य शिबी

दांडिया प्रशिक्षण

सहजयोग प्रशिक्षण