पुणे महानगरपालिकेच्या सहयोगाने प्रभागातील रसिक जनांसाठी आयोजित केल्या गेलेल्या यशस्वी कै. शारदाबाई पवार भव्य कला महोत्सवाला मिळालेली रसिक जनांची उत्स्फर्त दाद आणि स्थानिक प्रचंड प्रतिसाद हा उल्लेखनीयच होता. या महोत्सवात गोष्ट राकट महाराष्ट्राची, चित्रपट सृष्टीची १०० वर्षे आणि ख्यातनाम गायक महेश काळे यांच्या सूर निरागस हो या सारख्या लोकप्रिय कार्यक्रमांचा समावेश होता. यावेळी प्रभागातील कर्तबगार व आदर्श व्यक्तिंना पुरस्कार देऊन त्यांच्या आजवरच्या कार्याचा सत्कार करण्यात आला. या भव्य महोत्सवाच्या सांगता समारंभ प्रसंगी सन्माननीय अजितदादा पवार व इतर कला व विविध कार्यक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवाचे यशस्वी संयोजन सहकारी कार्यकर्त्यांसोबत केले होते.
आमच्या यशस्वी लोकाभिमुख वाटचालीमागे हाच तर गणरायांचा आशीर्वाद व देवीमातेचा कृपाप्रसाद लाभलेला आहे. प्रत्येक मंडळातील सक्रिय कार्यकर्त्यांची जाण असल्यानेच आजही स्थानिक परिसरातील गणेशोत्सव असो वा नवरात्र उत्सव आरतीचा मान मंडळ कार्यकर्त्यांनी जणू राखूनच ठेवलेला असतो. अशाच शुभारती व अभिषेक कार्यक्रम प्रसंगी भावी वाटचालीसाठी प्रार्थना करताना.