खेळ

स्थानिक क्रीडास्पर्धांच्या आयोजनातून भावी उत्तमोत्तम खेळाडूंचा शोध.
प्रभाग आणि परिसरातील उत्कृष्ट खेळाडूंसाठी मैदाने उपलब्ध करुन त्यांच्यातील क्रीडा-गुणांना, कौशल्याला वाव मिळावा व उद्याच्या आंतर शालेय महाविद्यालयीन स्पर्धांमधून थेट शहर, जिल्हा अगदी राज्य स्तरावरील खेळांमध्ये त्यांना संधी मिळावी यासाठी स्थानिक फूटबॉल, क्रिकेट, कराटे किंवा इतर खेळांच्या क्रीडा स्पर्धातून भावी उत्तमोत्तम खेळाडूंचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु असतो.

एव्हरेस्टवीर हर्षद राव याच्या उत्त कर्तबगारीला सॅल्यूट व प्रोत्साहन
कार्याचे एव्हरेस्ट गाठण्याच्या ध्येय उद्दिष्ठाने गिर्यारोहण प्रेमातून राबवल्या या कार्यक्रमात एव्हरेस्ट वीर हर्षद राव याच्या उत्तुंग कर्तबगारीला स्थानिक पर्यटन व गिर्यारोहण प्रेमींच्या साक्षीने सॅल्यूट करुन त्यांना पुढील कामगिरीसाठी विशेष अर्थसहाय्य व प्रोत्साहन देण्यात आले.

शरीर व मनाबरोबरंच जिथे संपूर्ण आरोग्य संवर्धन होते ते क्रीडांगण व खेळ याची ठेवून शरीर सौष्ठव स्पर्धांच्या यशस्वी आयोजनातून स्थानिक तसेच शहर, राज्य पातळीवरील शरीर सौष्ठव पटूंना प्रोत्साहन व त्यामाध्यमातून नवतरुणांना शरीरसंपदेचे महत्त्व कळण्याकरीता, व्यसन मुक्त राहण्याचा संदेश पोहाचविणाऱ्या भव्य राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे यशस्वीरित्य संयोजन केले.

प्रभागातील हा जलतरण तलाव अनेक वर्षापासून (मेन्टेनन्स) देखाभाली अभावी अनेक महिने बंद असल्याचे पाहून त्यासाठी खास निधीची तरतूद करुन हा स्विमिंग टँक आज सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी उपलब्ध करुन देण्याचे काम केले.