आरोग्य

प्रभाग आणि परिसरातील गोरगरीब नागरिकांच्या आरोग्य दृष्ट्या अत्यंत उपयुक्त अशा या कार्यरत रुग्णालयात गेली अनेक वर्षे काही महत्वाच्या अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध नव्हत्या, अनेक गोष्टी नादुरुस्त व निरुपयोगी बनल्या होत्या. या सर्व बाबी विचारात घेऊन स्व. शंकरराव पोटे रुग्णालयाचे नुतनीकरणातून क्षयरोग निवारण, दंत चिकित्सा, डिजीटल एक्स-रे, सोनोग्राफी, लहान मुलांसाठी लसीकरण व शहरी गरीब योजने अतंर्गत मोफत औषधे अशा अनेक अद्ययावत सुविधा आणि सुसज्ज व्यवस्थापनात रुपांतर केले.

स्थानिक रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांना शासकीय दरात अत्याधुनिक अशी एम.आर.आय उपचार सुविधा उपलब्ध व्हावी या दूरदृष्टीकोनातून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन ही उत्तम आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन दिली.

वेळ सांगून येत नसली तरी अपघात, तातडीच्या वेळप्रसंगी भ्रमनध्वनीवरुन १०८ नं लावला की, नागरिकांसाठी तात्काळ धावून येणारी रुग्णवाहिका सुरु करुन, इमर्जन्सी रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले. आणि संबंधित सहकाऱ्यांसमवेत आज ही रुग्णवाहिका अहोरात्र सेवेत कार्यरत आहे.

आरोग्यम धनसंपदा.

बालकांचा पोलिओ डोस असो अथवा पालकांचे आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने परिसरातील सर्वसामान्यांसाठी आरोग्य शिबिरे, साथीच्या विविध आजारांबाबत राबविण्यात येणाऱ्या आरोग्य चिकित्सांमधून नागरिकांच्या संपूर्ण शारिरीक चाचण्या तसेच उपचार केले जातात, जनजागृती आरोग्य रॅलीचे आयोजन केले जाते व तज्ञ डॉक्टर्स असल्याने नागरिकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून हजारो रुग्णांना आर्थिक हातभार लावून महानगरपालिके तर्फे अर्थसहाय्य मिळवून देण्यात आले.

प्रभागातील महिलांना जेवढ्या गरजेच्या तेवढ्या महागड्या अशा या ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती, मेमोग्राफी तपासणी व त्यावरील उपचार देण्यासाठी तज्ञ डॉक्टरांसह मोफत सदाफुली ब्रेस्ट कॅन्सर शिबिराचे आयोजन करण्यात आले

पोलिओ लसीकरण

पोलिओमुक्त भारताकडे वाटचाल करताना परिसरातील कोणतेही लहान मूल पोलिओ डोस पासून वंचित राहू नये याची योग्य ती खबरजारी घेतली जाते.