उद्यान
मानवी जीवनात जेवढे ऑक्सिजनला महत्व, तेवढेच वनराई, बागबगिचांना, याच जाणीवेतून प्रभागातील ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली. हिंदू संस्कृतीततल्या दारोदारच्या पवित्र तुळशीचे महत्त्व तसेच आयुर्वेदात औषधी वनस्पती म्हणून तिला असलेलं अनन्य स्थान, हे बाग-बगिचांमध्ये विहार करण्यासाठी आपल्या प्रभागातील नागरिक तसेच कुटुंबांना कळावे यासाठी ऑक्सिजन पार्कची संकल्पना साकारली. सुंदर अशा लॅण्डस्केप सह हिरवाईने नटलेल्या या ऑक्सिजन पार्क मध्ये ओपन एअर जिमची देखील सुविधा उपलब्ध आहे.
वनराईच्या संवर्धनातून पर्यावरण संतुलन आणि पर्यावरण संतुलनातून माणसाच्या नैसर्गिक जीवनाचे संरक्षण व्हावे या उद्दिष्ठातून वाळवेकर उद्यानात संत सृष्टीची संकल्पना याठिकाणी कुठच्या आरसीसी वा अनावश्यक बांधकामाला स्थान न देता साकार करण्यात आली आहे. जेणेकरुन प्रभाग आणि परिसरातील अध्यात्मिक तसेच साहित्यप्रेमी रसिक व भावी पिढीला संत साहित्य व वागमयाची माहिती, ज्ञान मिळावी.
मनाला भावनारे आणि डोळ्यांना सुखावणाऱ्या अशा या सुरम्य उद्यानातील विलोभनीय कारंजातून दिसणारा मनोहरी लेझर शो पाहताना नक्कीच इथे कुठे पाण्याचा गैरवापर तर होत नाही नां…अस वाटणारे जलसंवर्धन प्रेमीं नक्कीच सुखावतील हा विश्वास आणि हा प्रयास जाणवेल. कारण इथे मूळ नैसर्गिक पाणी स्त्रोताला कुठचे नुकसान न पोहोचविता नव्याने विकसित कारंजा करण्यात करण्यात आला आहे.
आदर्श आणि निरक्षरांनाही साक्षर करणाऱ्या अक्षरप्रेमी शिक्षिकेतल्या अद्भूत आविष्काराचा नमुना अनुभवायचा असेल तर यापुढे इथल्या मराठी संस्कृती आणि बाराखडीतल्या अक्षरांची ओळख करुन देणाऱ्या कै. शंकरराव कावरे उद्यान अक्षर बागेला नक्की भेट द्यावी. शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त अशा या बागेला नागरिकांचे शारिरीक स्वास्थ जोपासले जावे यासाठी जॉगिंग ट्रॅकची देखील जोड देण्यात यावी ही संकल्पनाही इथे अस्तित्वात आली आहे.
शारिरीक व मानसिक स्वास्थ्याबरोबरंच बुध्दीलाही चालना अशा उत्कृष्ठ समन्वयाचा एकत्रित आनंद देणाऱ्या या सुरम्य आणि अद्ययावत अशा नवजीवन उद्यानात खरोखरंच अनोख्या कौटुंबिक नवजीवनाचा सुखद अनुभव देणाऱ्या सापशिडीसारख्या बौध्दिक अशा विविध खेळ व साधनांचा जाणीवपूर्वक समावेश केला आहे.
सुंदर, सुरम्य उद्यानाचे रुपांतर विज्ञान तारांगणाच्या नावाखाली म्हणजे कृत्रिम कॉक्रिटी करणात करण्याच्या नियोजनाला तीव्र विरोध दर्शवित देत फुलपाखरु उद्यान जैसे थे नव्हे तर अधिक विकसित करुन घेण्याचे काम वेळीच पुढाकार घेऊन ह्या उद्यानाला वाचवले आहे.
संत गाडगेबाबांची प्रेरणा आणि प्रभागातील नागरिकांच्या आग्रहास्तव येथील अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त नाल्यांचे संपूर्ण चॅनेलायझिंग करून अनेक विविध शोभिवंत फुलझाडे व देशी झाडे लावून सुंदर, सुरम्य नाला गार्डन्स केले.
वाढदिवस मुलाचा, मुलीचा असो किंवा कोणताही दिवसाचा योग असो, आपल्या प्रभाग आणि वाढत्या परिसरासह, शहरपातळीवर देखील वृक्षारोपणाचे व्यापक उपक्रम राबवून जागोजागी हजारो वृक्षांची लागवड करुन पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्राधान्याने प्रयत्न केला.