पर्वती संवाद – अंमली पदार्थ व व्यसनांच्या विळख्यात अडकत चाललेली तरुणाई.

आज आपली तरुणाई कुठेतरी व्यसनांच्या विळख्यात अडकत चालल्याचे चित्र दिसत आहे. आणि हे वेळीच रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी पर्वती संवाद चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या चर्चेत सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, सामाजिक कार्यकर्त्या विशाखा वेलणकर आणि अभिनेते रमेश परदेशी म्हणजेच पिट्या भाई उपस्थित होते.

व्यसनंही सकारात्मक असावीत – वेलणकर

पुण्यासारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडत असेल तर अशा गोष्टी होऊच नयेत, म्हणून कार्यरत असणारी संबंधित यंत्रणा काय करीत होती, या गोष्टींसाठी सरकारी यंत्रणाच जबाबदार आहे असं वाटतं. त्यात सोशल मीडियाचा होत असलेला दुरूपयोग आहेच. पॉझिटिव्ह व्यसनं
हेच निगेटिव्ह व्यसनांना उत्तर असू शकते, त्यामुळे चांगली व्यसनं लावून घेणं गरजेचं. शिवाय अशा गोष्टी रोखण्यासाठी ‘एव्हरीथिंग इज मॅनेजेबल’ हा मंत्र बदलणे गरजेचे आहे, असे मत सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले. शहरात अमली पदार्थांचे वाढणारे सेवन,त्याच्या आहारी गेलेली तरुणाई, व्हायरल झालेला व्हिडीओ आणि या सगळ्यामुळे खडबडून जागी झालेली यंत्रणा या पाश्र्वभूमीवर माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी आयोजित पर्वती संवाद या महाचर्चा कार्यक्रमात सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर बोलत होते. यावेळी ड्रग्स संबंधित काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विशाखा वेलणकर आणि अभिनेते रमेश परदेशी उपस्थित होते.विशाखा वेलणकर म्हणाल्या, ‘मला सगळं विसरायचंय याचं टेन्शन घेऊन अनेकजण ड्रग्स आणि व्यसनाधीतेकडे वळतात. पण, ते हेच विसरतात की ड्रग्स आणि व्यसनाधीतेमुळे हे टेन्शन काही कालावधीसाठीच नाहीसं होतं आणि पुन्हा नंतर सामोरं येतंच. स्वनियमन आणि स्वसंयम हाच ड्रग्स आणि व्यसनाधीतेकडे न वळण्याचा इलाज आहे.’

लक्षात ठेवा.. ड्रग्स आणि व्यसनांपासून फक्त आणि फक्त नुकसानच होते..

Instagram