कोरोना काळ हा आपल्या सर्वांसाठीच अगदी कठीण होता. मात्र, लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना, आधी आपली लोकं आणि मग आपण असा विचार करायची सवय झाली आहे. त्यामुळे कोरोनासारख्या अत्यंत बिकट संकटातही पर्वतीकरांसाठी अगदी पुढे राहून काम केले. लसीकरणापासून ते भाजीपाला, अन्नधान्य घरोघरी पोहोचवण्यापर्यंत सर्व काम सुरळीत पद्धतीने करण्यात आले. कोणाच्या घरी कोरोना रूग्ण आढळल्यास त्याची तपासणी करणे, घरात औषध फवारणी करणे, रूग्णाला अॅडमिट करणे, योग्य ते उपचार होत आहेत का, यावर देखरेख करणे ही सर्व कामे केली.

कोरोना काळात केलेली औषध फवारणी

भाजीपाला अन्नधान्य यांसारख्या गरजू सेवांचा पुरवठा

तात्काळ वैद्यकीय मदत

लसीकरण

मदत निवारण केंद्र

मास्क वाटप