अधिक माहिती
स्थायी समिती अध्यक्षपदी
सौ .अश्विनी नितीन कदम
हा ध्यास हीच आस मनोमन ठेवून गेल्या दोन दशकातील आपल्या या सामाजिक राजकीय वाटचालीतील गेली १० वर्षे नगरसेविका म्हणून तर दीड वर्षे स्थायी समिती अध्यक्षा म्हणून आपल्या या प्रभाग आणि परिसरात आम्ही काम करतो आहोत. तुमच्या आमच्या कार्य सहकार्याच्या या कारकिर्दीत उद्यान, आपल्या सर्वसंपन्न परिसर आणि सर्व समृद्द समाजाचे ध्येय उद्धिष्ठ ठेवले .ज्यासाठी आपल्या प्रभाग आणि परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्षेत्रात आम्ही आपल्या स्थानिक अनेक विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे तसेच यशस्वि महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यरत आहोत. व या माध्यमातून आम्ही आजवर विविध सामाजिक तसेच विधायक उपक्रम, विविध समाजउपयोगी कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविले आहेत.